GRAMIN SEARCH BANNER

सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेला विकासच मला करायचा आहे : आमदार किरण सामंत

लांजा येथील जनता दरबारात तत्काळ अनेक प्रश्न मार्गी

लांजा : पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की शहर विकास आराखड्यात नागरिकांना पाहिजे तसे बदल करून सुधारणा केल्या जातील. सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेला विकासच मला करायचा असून मी लांजाचा विकासाकरिता खुप स्वप्ने बघितली आहेत आणि त्यासाठी उद्योग, रोजगार या संदर्भात विविध स्तरावर माझे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी जनता दरबारात बोलताना केले.

लांजा शहरातील आणि विशेषता नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टीने लांजा समन्वय समितीच्या मागणीवरून आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार सोमवार ११ ऑगस्ट दुपारी ३ वाजता गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) या ठिकाणी पार पडला. यावेळी आमदार सामंत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जनतेच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी असून प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधून समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यावर भर दिला जात आहे. माझ्याकडे समस्या घेऊन आलेला व्यक्ती हा माझा विरोधक जरी असला तरी मी त्याचे काम करून देतो. मतदारसंघात सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न रोजगारागाचा आहे. त्याकरिता एमआयडीसी व विविध उद्योग आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत बोलणे सुरू आहे. लांजा शहरासह तालुक्यात विविध विकासकामे प्रोसेस मध्ये आहेत, त्यांचा पाठपुरावा सतत सुरू असून ते देखील लवकरात लवकर पूर्ण होतील. विकासकामे जनते मधूनही सुचवली गेली पाहिजेत, त्यांचाही पाठपुरावा करून तेही मार्गी लावली जातील असे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी गणेशोत्सवा निमित्त बाजारपेठ आणि वाहतूक अशा विविध विषयांसंदर्भात नियोजन करण्याचे आदेश आमदार सामंत यांनी दिले आहेत.

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यां संदर्भात आयोजित या जनता दरबारात भूमी अभिलेख कार्यालयातील रखडलेली कामे, शहर विकास आराखड्यात असलेल्या हरकतीं संदर्भात चर्चा, विविध दाखले काढताना अटींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, शहरातील काही नागरिकांना घरा पर्यंत रस्ता नसल्याच्या तक्रारी, पाण्याची समस्या, दाभोळे मार्गावरुन होणारी चिरे वाहतूक, रस्ते आणि गणपती विसर्जनाचे घाट स्वच्छ करणे, गणपतीपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरणे, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करणे, कोत्रेवाडीतील येथील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे, अनेक ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम नसल्याने अडचणी, पशुवैद्यकीय विभागातील विविध विषय, नगरपंचायत कार्यालयात कामांना होणारा विलंब, पंचायती समिती नवीन इमारती मध्ये दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्ष मिळावा, लांजा आगारातील एसटी बसच्या समस्या, नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग रचना, पौलस्तेश्वर मंदिराजवळील रहदारीचा धोकादायक पूल, रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी मतदारसंघात आणावी उपस्थित जनेततेमधून मागणी, अकरावीचा ऑनलाईन प्रक्रियेमुळत होणारा खोळंबा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी केल्या. तर काही नागरिकांच्या अडचणी जनता दरबारा दरम्यान जागेवरच सोडीवल्या गेल्या. अनेक रखडलेली कामे जनता दरबारातच तात्काळ मार्गी लागल्याने नागरिकांनी आमदार सामंत यांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, या जनता दरबारा प्रसंगी व्यासपीठावर आमदार किरण सामंत यांच्यासह उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, सहाय्यक नगररचनाकर स्मिता कलगुटकी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी राजेंद्र कुलकर्णी, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी, पोलीस निरीक्षक निळकंठ  बगळे आदी उपस्थित होते. यावेळी जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Total Visitor Counter

2474981
Share This Article