रत्नागिरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धेत इंद्रधनु प्रतिष्ठान, पानवल (घवाळीवाडी) च्या ‘एक्सपायरी डेट’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत नूतन बालमित्र बोरकर नाट्य मंडळ, वरवडे यांच्या ‘मी तर बुवा अर्धा शहाणा’ या नाटकाला द्वितीय क्रमांक, तर गणेश प्रासादिक नाट्य मंडळ, गणपतीपुळे यांच्या ‘मोरुची मावशी’ या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेत प्रशांत घवाळी यांना ‘एक्सपायरी डेट’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. रक्षिता पालव यांना ‘चांदणे शिंपित जा’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर आदित्य बापट यांना ‘मोरुची मावशी’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिग्दर्शन विभागात प्रथम क्रमांक प्रशांत घवाळी (‘एक्सपायरी डेट’), द्वितीय क्रमांक दशरथ कीर (‘मी तर बुवा अर्धा शहाणा’), आणि तृतीय क्रमांक गजानन जोशी (‘मोरुची मावशी’) यांनी पटकावला. अभिनय (पुरुष) विभागात प्रथम क्रमांक आदित्य बापट (‘मोरुची मावशी’), द्वितीय क्रमांक गौरव फडके (‘चांदणे शिंपित जा’), आणि तृतीय क्रमांक कैलास दामले (‘रायगडाला जेव्हा जाग येते’) यांना मिळाला. अभिनय (महिला) विभागात प्रथम क्रमांक रक्षिता पालव (‘चांदणे शिंपित जा’), द्वितीय क्रमांक ज्योती निमसे (‘छंद हा प्रियेचा’), आणि तृतीय क्रमांक अमिषा देसाई (‘माझा कुणा म्हणू मी’) यांना देण्यात आला.
विनोदी भूमिकेसाठी प्रथम क्रमांक सुभाष शिवलकर (‘गेला माधव कुणीकडे’), द्वितीय क्रमांक दीपक घवाळी (‘एक्सपायरी डेट’), आणि तृतीय क्रमांक प्रसन्न जोशी (‘मोरुची मावशी’) यांनी पटकावला. लेखन विभागात प्रथम क्रमांक प्रज्ञा जोशी (‘काहीतरी वेगळं’) आणि द्वितीय क्रमांक सचिन फुटक (‘मधूर मिलन’) यांना मिळाला. तांत्रिक अंग विभागात प्रथम क्रमांक श्री देव गांगेश्वर नाट्य समाज, कोळंबे (‘रायगडाला जेव्हा जाग येते’), द्वितीय क्रमांक अक्षय थिएटर्स (‘श्री स्वामी समर्थ हम गया नही जिंदा है’), आणि तृतीय क्रमांक श्री खंडाळेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, खंडाळा (‘मोरुची मावशी’) यांना देण्यात आले.
याव्यतिरिक्त, ‘माझा कुणा म्हणू मी’ (श्री आगवे ग्रामस्थ मंडळ), ‘गेला माधव कुणीकडे’ (कै. प्रभाकर भोळे स्मृती कलामंच, काळबादेवी), ‘छंद हा प्रियेचा’ (पावणाई देवी कला उत्कर्ष मंडळ, देवूड), ‘चांदणे शिंपित जा’ (आदित्यनाथ व्याडेश्वर ब्रम्हवृंद नाट्य मंडळ, गणेशगुळे) आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ (श्री देव गांगेश्वर नाट्य समाज) या नाटकांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. सावली मयेकर, दशरथ रांगणकर, प्रथमेश भाटकर, शौनक जोशी, रोशन धनावडे, आर्या शेटये, प्रसाद घाणेकर, पूजा सावंत जोशी, कौशल मोरे, रमा सोहोनी, समिक्षा सावंतदेसाई, गणेश गांगण, शिवानी जोशी, जयप्रकाश पाखरे, उदयराज भाटकर, विनोद शिर्के, अर्जुन धाकू माचिवले, सौरभ जाधव, सुरेखा नाखरेकर, शशिकांत खापरे या कलाकारांना अभिनयाची गुणपत्ता प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. नाट्य क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोकणातील नाट्य परंपरा जपण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते, असे मत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केले.