लांजा : तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालित श्रीराम विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज तर्फे स्वर्गीय रमेश धोंडू डोळस स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, महाविद्यालयीन आणि खुल्या अशा चार गटांमध्ये होणार आहे. पहिल्या पाचवी ते सातवीच्या गटाला सादरीकरणासाठी ५ ते ६ मिनिटांचा वेळ असून विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५० आणि ५०० रुपयांची बक्षिसे दिली जातील. दुसऱ्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कथकथनासाठी ६ ते ९ मिनिटांचा वेळ असून विजेत्यांना १२२५, १००० आणि ७५० अनुक्रमाने दिली जातील. तिसऱ्या महाविद्यालयीन गटाकरिता कथाकथनाचा वेळ ६ ते १० मिनिटांचा, तर चौथ्या खुल्या गटाकरिता १० ते १२ मिनिटांचा वेळ असेल. दोन्ही गटांकरिता पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे २०००, १५०० आणि १००० रुपयांची बक्षिसे दिली जातील.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना सन्मानचिन्ह दिले जाईल. कथेला विषयांचे बंधन नाही. प्राथमिक आणि माध्यमिक गटामध्ये सहभागी शाळांनी कमाल २ विद्यार्थ्यांची निवड करून पाठवावे. विद्यार्थी गटातील स्पर्धकांनी सोबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्याचे पत्र आणावे. स्पर्धेसाठी होणारा प्रवास खर्च स्पर्धकाने स्वतः करायचा आहे. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.
महाविद्यालयीन व खुल्या गटामध्ये प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ८ स्पर्धकांचा स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी आपली नावे १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत सोबत दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदवावीत. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धा श्रीराम विद्यालयाच्या टोयो सांस्कृतिक सभागृहात १६ सप्टेंबर रोजी सकाळी वाजता सुरू होईल. अधिक माहितीसाठी ए. बी. डोळे (९३२५१७८६७२) किंवा व्ही. वाय. बंडगर (८२७५९२००९०) यांच्याशी संपर्क साधावा.
लांजा : वेरवली विद्यालयातर्फे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा
