GRAMIN SEARCH BANNER

दापोली : पांगारी येथे एस.टी. बसला अपघात; दोन प्रवासी किरकोळ जखमी

Gramin Varta
118 Views

दापोली : येथील आगारातून पांगारीकडे जाणाऱ्या एस.टी. बसला सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर) दुपारी सुमारास अपघात झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस साईडपट्टीवर घसरून रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बस रस्त्याच्या कडेला कलंडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बस उभी करण्याचे व रस्ता मोकळा करण्याचे काम करण्यात आले.

Total Visitor Counter

3199615
Share This Article