GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील तुळशी वृंदवनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील जेलनाका परिसरात उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेलनाका येथील तुळशी वृंदावनाचे साऱ्यांना आकर्षण आहे. मात्र याचा लोकार्पण सोहळा केव्हा होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आज पालकमंत्री उदय सामंत यांनी या तुलसी वृंदावनाचे लोकार्पण केले. आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या या तुलसी वृंदावनांने मन प्रसन्न होतं आहे. या कार्यक्रमात तुळशी वृंदवनाच्या सौंदर्यीकरणाबाबत पालकमंत्री सामंत यांनी समाधान व्यक्त करत रत्नागिरीच्या सौंदर्य वृद्धीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तुळशी वृंदावनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक मान्यवर आणि रत्नागिरीकर उपस्थित होते.

जेलनाका सिग्नलकडून गोगटे कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यालयालगत असलेल्या एका वापरात नसलेल्या जागेचे रूपांतर या आकर्षक तुळशी वृंदावनात करण्यात आले आहे. ही जागा गेली अनेक वर्षे निरुपयोगी अवस्थेत होती. या जागेचा योग्य वापर व्हावा आणि तो परिसर अधिक आकर्षक दिसावा, यासाठी पालकमंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आळंदीतील तुळशी वृंदावनाच्या धर्तीवर येथेही असेच एक सुंदर उद्यान विकसित करण्याचे नियोजन केले, जे आता प्रत्यक्षात उतरले आहे.

Total Visitor Counter

2475113
Share This Article