रत्नागिरी : मिरजोळे हनुमाननगर येथील कृष्णा ताराणे प्रधान (वय ५४) यांचा तापाच्या आजारामुळे रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
माहितीनुसार, प्रधान यांना काही दिवसांपासून ताप येत होता. सुरुवातीस त्यांच्यावर कारवांचीवाडी येथील डॉ. पानगळे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू होते. १५ जुलै रोजी त्यांची प्रकृती ढासळल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. मात्र १६ जुलैच्या पहाटे तीनच्या सुमारास प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना थेट अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच १७ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघधरे यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : मिरजोळे येथील प्रौढाचा मृत्यू
