GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात काँग्रेसमधील तिघांचे सहा वर्षासाठी निलंबन, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका

Gramin Varta
425 Views

रत्नागिरी : चिपळूण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये शिस्तभंगाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. पक्षविरोधी हालचाली केल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमधील तीन जणांना तात्काळ सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई अमलात आली असून, लियाकत सतार शाह, तुळशीराम दत्ताराम पवार आणि राजेंद्र भूरण या तिघांचा यात समावेश आहे. तिन्ही नेते चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील रहिवासी आहेत.

या संदर्भात वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, संबंधितांचे वर्तन पक्षशिस्तीला बाधक असल्याने कठोर पाऊल उचलावे लागले. शिस्तभंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सौम्यता ठेवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पक्षाने दिला आहे.

Total Visitor Counter

3375832
Share This Article