GRAMIN SEARCH BANNER

महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाला “छत्रपती महामार्ग” नामकरण करणार – नितीन गडकरी

Gramin Varta
8 Views

रायगड: केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज संभाजीराजे छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड़-रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता, त्याला “छत्रपती महामार्ग” असे नाव देण्याची मागणी मांडली असता तात्काळ प्रतिसाद देत “छत्रपती महामार्ग” असे नामकरण करण्यात येणार अशी घोषणा केली.

पूर्वी छोटा व वळणावळणाचा असलेला हा रस्ता आज गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने 206 कोटींच्या निधीमधून विकसित होत आहे. जवळपास ९०% काम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखोंची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरते आहे.

या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्प व सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना मांडली असता, गडकरी यांनी ती तत्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल यावरही मार्गदर्शन केले.

संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष या नात्याने आणि लाखो शिवभक्तांच्या वतीने गडकरीचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

Total Visitor Counter

2647334
Share This Article