दापोली : शहरातील काळकाईकोंड परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून, रविवारी एका लहान मुलावर कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना उसी रेसिडेन्सी इमारतीसमोर घडली असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीसमोर खेळत असलेल्या एका लहान मुलावर अचानक भटक्या कुत्र्यांनी झडप घालण्याचा प्रयत्न केला. मुलगा अत्यंत घाबरलेला होता आणि प्रसंग अतिशय गंभीर वाटत होता. मात्र, त्याच वेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते सलीम रखांगे यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने पुढे येत त्या मुलाला कुत्र्यांपासून वाचवलं. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि बालकाचा जीव वाचला.
या घटनेनंतर पालक वर्ग आणि परिसरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, दापोली नगरपंचायतीने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना त्वरित करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
दापोलीत कुत्र्याचा मुलावर हल्ला; नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला
