GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्राची सुकन्या दिव्या देशमुखने लंडनमध्ये बुद्धिबळमध्ये कोरले भारताचे नाव!

Gramin Search
7 Views

वर्ल्ड नंबर वन’ ग्रँडमास्टर होऊ यिफान हिला पराभूत करीत दिव्याने रचला इतिहास

नागपूर : महाराष्ट्राच्या, नागपूर जिल्ह्याची सुकन्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ जगतात भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धेत, दुसऱ्या टप्प्यातील उपांत्य फेरीत दिव्याने ‘वर्ल्ड नंबर वन’ ग्रँडमास्टर होऊ यिफान हिला पराभूत करत अवघ्या देशाला अभिमान वाटावा, असा जबरदस्त विजय मिळवला आहे.


सातत्य, कठोर सराव आणि निष्ठेच्या जोरावर दिव्या देशमुख हिने संपादित केलेलं हे यश संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या विजयामुळे दिव्या देशमुख हिचे नाव आता जागतिक बुद्धिबळपटूंमध्ये (World Chess Players) आदराने घेतले जात आहे. तिच्या या यशाने अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून, भारतीय बुद्धिबळाचे भविष्य (Future of Indian Chess) अधिक उज्ज्वल दिसत आहे. दिव्या देशमुखच्या या शानदार कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

2647353
Share This Article