GRAMIN SEARCH BANNER

निनावी देवीच्या नवरात्रौत्सवानिमित्त डबलबारी भजनांचा जंगी सामना

Gramin Varta
602 Views

धामणी | प्रतिनिधी
श्री निनावी देवी प्रासादिक मंडळ, नावडी संगमेश्वर यांच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणून ४ डबलबारी भजनांचा जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
रंगतदार भजन स्पर्धा रंगणार आहे.

यावेळी रसिकांना ४ डबलबारी भजनांचे आयोजन  करण्यात आले असून, देवीच्या दरबारात ही भक्तिसंध्या गूंजणार आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक भक्तित तल्लीन होताना पहायला मिळणार तसेच संपूर्ण उत्सवात अभंग, भक्तिगीत गायन, वारकरी भजने, आरत्या, नऊ रुपांची सजावट, पुष्पपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
२२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना करून उत्सवाची सुरुवात होईल. यानंतर दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री देवी निनावी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या चरणी भक्ती अर्पण करावी.

Total Visitor Counter

3379250
Share This Article