GRAMIN SEARCH BANNER

राजापूर नगरपरिषद निवडणुकांत केवळ दोनच अर्ज दाखल; नगरसेवक पदासाठी राकेश खटावकर प्रभाग क्र. ४ मधून अपक्ष उमेदवार

Gramin Varta
201 Views

राजापूर : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी नगरसेवकपदासाठी एक अर्ज दाखल झाला. राकेश सुनील खटावकर यांनी प्रभाग क्र. ४ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी एक असे एकूण दोन अर्ज दाखल झाले आहेत.

वीस सदस्य संख्या असलेल्या राजापूर नगरपरिषदेसाठी थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून १७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. चार दिवस उलटूनही केवळ दोनच अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत फारशी हालचाल दिसत नाही. नगराध्यक्षपदासाठी ज्योती सुनील खटावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून गुरुवारी राकेश सुनील खटावकर यांनी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्जासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. बंडखोरीची शक्यता आणि युतीतील गोंधळ लक्षात घेता राजकीय पक्ष अद्याप सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तरी युतीबाबत शहरवासियांमध्ये संभ्रम कायम आहे. शिवसेना-भाजप युती होणार का, झाल्यास जागावाटप कसे असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Total Visitor Counter

3199542
Share This Article