संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड.पी.आर.नामजोशी कला ,वाणिज्य,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन करण्यात सायबर तज्ञ डॉ अक्षय फाटक उपस्थित होते.यावेळी,व्यासपीठावर माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सहसचिव दीपक शिगवण,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,विवेक ढोल्ये, सोहम बापट, अरुण फाटक उपस्थित होते.
या वेळी डॉ.अक्षय फाटक यांनी दैनंदिन जीवनात मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी विषयी सखोल माहिती दिली.फेसबुक,व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम ही ॲप वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी,पासवर्ड ला किती महत्व आहे.हे समजावून सांगितले. सोशल मीडिया हाताळताना कोणत्या दक्षता घ्यायला हवी याबाबत माहिती दिली.आजच्या पिढीला सायबर संस्कारांची गरज असल्याचे नमूद केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले.त्यांचे डॉ अक्षय फाटक यांनी शंका समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.
माखजन हायस्कुल येथे सायबर सिक्युरिटी वर मार्गदर्शन
