रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा परिसरात एका अज्ञात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
हातखंबा येथील श्रीकांत जठार यांच्या आंबा बागेत हा तरुण झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून संबंधित प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
सदर तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करीत आहेत.
हातखंबा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
