GRAMIN SEARCH BANNER

रोहा तालुक्यातील ऐनवहाळ गावाच्या हद्दीत ट्रक पलटी, एकाचा जागीच मृत्यू,चौघे जखमी

Gramin Varta
14 Views

रोहा: तालुक्यातील पुगांव ते ऐनवहाळ या मार्गांवर ट्रक क्र. एमएच ४२ एक्यू १६२५ वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक पलटी झाला व त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चौघेजण जखमी झाले आहेत.

पुगांव ते ऐनवहाळ येथे ट्रकचालकाने ट्रक मध्ये माल खाली करणारे हमाल यांना ट्रक मध्ये बसवून घेऊन जात असतांना ऐनवहाळ गावाच्या हद्दीत रोड वळणाचा असल्यामुळे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणाने ट्रक उजव्या साईडला नेऊन कच्च्या रोडवर टायर गेल्याने ट्रक चिखलाच्या मातीत खचून ट्रक पलटी झाला. होऊन ट्रक मध्ये बसलेले साक्षीदार व स्वतःचे लहानमोठे दुखापतीस तसेच जितु उर्फ मोदी प्रेमजीत मखवाना याच्या अंगावर ट्रक मधील रेतीच्या गोणी पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर संतोष शांताराम कोकाटे, प्रफूल गजानन मगर, ज्ञानेश्वर मोरू साळवी, संजय विठोबा चोरगे हे चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती सुधारत आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी घटना स्थळी भेट दिली.त्यांच्या मार्गदर्शना खाली सह. पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.

Total Visitor Counter

3073094
Share This Article