GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: राजापूर : मीठगवाणे सागरी महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात;सात महिला गंभीर जखमी, एक ठार

राजन लाड, जैतापूर :मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठाराकडे निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वाहन सुमारे 100 ते 150 फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेले. या अपघातात टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. तसेच टेम्पोचालक आणि केबिनमधील इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले.

सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, 15-20 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सागरी पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2474914
Share This Article