रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या जयस्तंभा येथे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी या संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या आकर्षक ‘रोटरी क्लॉक टॉवर’चे लोकार्पण रविवारी राज्य उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या नवीन क्लॉक टॉवरमुळे रत्नागिरीच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांना वेळेची अचूक माहिती मिळणार आहे.
११.५ फूट उंचीचा असलेला हा क्लॉक टॉवर अत्यंत आकर्षक डिझाइनमध्ये बनवण्यात आला आहे. या टॉवरमुळे केवळ वेळेची माहितीच नव्हे, तर रत्नागिरी शहराची शोभादेखील वाढणार आहे, असे बोलले जात आहे.
या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, विलास चाळके, रोटरी क्लबचे अध्यक्ष रुपेश पेडणेकर, सचिव ॲड. मनीष नलावडे, कोषाध्यक्ष माधुरी कळंबटे, तसेच सीनियर रोटेरिअन धरमसीभाई चौहान, केशवराव इंदुलकर, विनायक हातखंबकर, अशोक घाटे, नलेश मुळ्ये, प्रमोद कुलकर्णी, श्रीकांत भुर्के, रोहित वीरकर आणि असंख्य रोटरी सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.