GRAMIN SEARCH BANNER

दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे महाड भोर पंढरपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद

Gramin Search
8 Views

रायगड : कोकण आणि राज्याच्या पश्चिम विभागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी.डी,(ता. महाड) राजेवाडी ते वरंधा – भोर – महाड या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने या महामार्गावरील वाहतूक तीन महिने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांनी काढले आहेत, मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित कधी होईल असा सवाल या परिसरातील नागरिक व वाहतूकदार शासनाला विचारत आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा म्हापळ- भोर- पंढरपूर या रस्त्याचे रुंदीकरण गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. वरंधा घाट आणि  पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाचे काम मागील तीन वर्षापासून चालू आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतूकदार तसेच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्याचबरोबर या मार्गावर सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात.रायगड जिल्ह्यातील महाड हद्दी मधील पारमाची, माझेरी, गावाजवळ रस्ता  खचला आहे.या ठिकाणी भविष्यात केव्हाही भूस्खलन होण्याची शक्यता आहे.  २०२१ मध्ये याठिकाणी रस्ता वाहून गेला होता. नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेते.त्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे करू नये घाटातील दुरुस्तीचे काम संथतीने होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पुणे जिल्हाधिकारी यांनी १६ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रिका नुसार. राष्ट्रीय महामार्ग ९६५. डी.डी. राजेवाडी ते वरंधा भोर महाड हा मार्ग १/६/२०२५ पासून २८/९/२०२५ या कालावधीत वाहनांच्या वाहतुकी करता पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्हा व पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाच्या कामामध्ये अनेक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र असल्याने नैसर्गिक आपत्ती होऊन दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे  १/६/२०२५ ते दिनांक ३१/९/२०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड मध्यम वाहनांच्या वाहतुकीसाठी वरंधा घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Total Visitor Counter

2654346
Share This Article