GRAMIN SEARCH BANNER

नॅशनल हेरॉल्ड : 50 लाखात बळकावली 2 हजार कोटींची मालमत्ता

राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी 50 लाखात 2000 कोटींची मालमत्ता बळकावल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी), बुधवारी दिल्लीच्या राऊस ऐव्हेन्यू कोर्टात केला.

ईडीच्या वतीने न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची (एजेएल) मालमत्ता २ हजार कोटी होती.एजेएलकडे दिल्ली, लखनौ, भोपाळ, इंदूर, पंचकुला, पाटणा आणि इतर ठिकाणी मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ता केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी 1947 नंतर वृत्तपत्र छपाई आणि प्रकाशनासाठी प्रदान केल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर हे निवेदन सादर करण्यात आले. नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या फिर्यादी तक्रारीची दखल घ्यावी की नाही याबद्दल न्यायालय युक्तिवाद ऐकत आहे. सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजू यांनी म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पैसे वळवण्यासाठी फसवे व्यवहार करण्यात आले होते. या प्रकरणीची सुनावणी गुरुवारीही सुरू राहणार आहे.

Total Visitor Counter

2475583
Share This Article