GRAMIN SEARCH BANNER

महाडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत पावलेले मांजर दिले प्रशासनाला भेट

Gramin Varta
7 Views

महाड : शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी प्रचंड हौदोस घातल्याचे चित्र शहरातील सर्वच भागात दिसत आहे. दिवसा ढवळ्या लहान मुले, वयस्कर माणसे यांच्या अंगावर जाण्याचे तसेच त्यांना चावण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.

तर रात्री बेरात्री कुत्र्यांच्या टोळीने हल्ले करण्याच्या प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. एकट्या दुकट्या मोटार सायकल स्वारावर हल्ले करणे. कारच्या चारी बाजूने घेराव करून हल्ला करण्याचे प्रकार होत आहेत. यामध्ये जखमी होणाऱ्या नागरिकांची संख्या ही वाढत असताना. प्रशासन मात्र या बाबतीत उदासीन असल्याचे चित्र पाहावायस मिळत आहे. नागरिकांमधून याबद्दल प्रचंड चीड व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पार्टीने याबद्दल आज आक्रमक पाऊल उचलले असून चक्क भकट्या कुत्र्यांच्या हल्यात मृत पावलेले मांजरच प्रसासनाला भेट दिले. महाड शहराचे अध्यक्ष पराग वडके यांनी याबाबतीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून अजुन आमच्या संयमाचा किती अंत पहाल असा संतप्त सवाल केला. काही दिवसांपूर्वी च वाघ बकरी चहा चे मालक पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला त्यात त्यांचा मृत्यू झाला. मग अशी एखादी घटना घडण्याची वाट प्रसासन पाहात आहेत का असा परखड सवाल त्यांनी केला. तसेच तुम्हाला यावर आळा घालणे जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पक्षाच्या माध्यमातून यावर योग्य कृती करू असे निवेदन ही दिले. भटक्या कुत्र्याकडून बळी जाण्याची वाट पाहू नका. नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळू नका असे प्रतिपादन शहर अध्यक्ष पराग वडके यांनी कळकळून प्रशासनाला सांगितले. तसेच येत्या चार दिवसात आम्हाला शब्द नको कृती हवे असा गरभीत इशारा ही प्रशासनाला आपल्या निवेदनातून दिला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, विधानसभा अध्यक्ष मुद्ससीर भाई पटेल, तालुका संघटक नितीनभाऊ जाधव, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास भाऊ चव्हाण, शहर अध्यक्ष पराग वडके निकेत तांबट तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2648467
Share This Article