GRAMIN SEARCH BANNER

राजापूर देवीहसोळ येथे २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात

Gramin Varta
416 Views

राजापूर : तालुक्यातील मौजे देवीहसोळ येथील ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा श्री जाकादेवी विश्वस्त संस्था तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.

हा सोहळा २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून सर्व देवीभक्तांनी उपस्थित राहून नवरात्रीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश विचारे यांनी केले आहे.

नवरात्रोत्सव काळात देवळात दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ सप्टेंबर (शनिवार) : महिलांसाठी पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धा, विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिके.

२८ सप्टेंबर (रविवार) : खास आरती स्पर्धा, ज्यात रोख रक्कम व चषक देण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संस्थेचे सचिव श्री. अविनाश भोवड (मो. ९२२३१ ४७६८४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3369379
Share This Article