GRAMIN SEARCH BANNER

दापोली पोलिसांची जलद कामगिरी: शाळेतील चोरीचा २४ तासांत उलगडा

Gramin Varta
353 Views

दापोली : दापोलीतील एसटी स्टँडच्या मागे असलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत घडलेल्या चोरीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात उकलून दाखवला आहे. सोमवारी सकाळी शिक्षकांनी शाळा उघडली तेव्हा मुख्याध्यापकांची खोली अस्ताव्यस्त दिसून आली. कपाट उघडण्याचा प्रयत्न, विखुरलेल्या कागदपत्रा आणि वस्तू पाहून चोरी झाल्याचा संशय पक्का झाला.

प्रकरणाची माहिती मिळताच दापोली पोलीस दलाने तातडीने पंचनामा करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ परिसरातील हालचालींचा बारकाईने शोध घेतला. गोपनीय माहिती व तांत्रिक साधनांच्या मदतीने पोलिसांनी मंगळवारी संशयिताला ताब्यात घेतले आणि चोरी प्रकरणाचा गुंता सोडवला.

पोलिसांच्या या चोख व जलद कारवाईबद्दल दापोली पंचायत समितीचा शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि शिक्षक यांनी समाधान व्यक्त करून संपूर्ण पोलिस दलाचे अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3199495
Share This Article