GRAMIN SEARCH BANNER

आमदार शेखर निकम चषक क्रिकेट स्पर्धेचा मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा संघ विजयाचा मानकरी

Gramin Varta
3 Views

अजिंक्य वॉरियर्स चिपळूण उपविजेता

शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित ओव्हरआर्म भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा

चिपळूण (प्रतिनिधी):-  सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या मैदानात रंगलेल्या शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा या संघाने अजिंक्य वॉरियर्स चिपळूण या संघावर मात करीत विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा दिनांक १ मे ते ३ मे रोजी दरम्यान चुरशीची झाली.  प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी चौकार – षटकार खेचत सामना रंगतदार केला. यामुळे खेळाडूंनी क्रीडा रसिकांची जिंकली. विशेषत: चौकार – षटकारावर क्रीडा रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत खेळाडूंना प्रेरणा दिली. तर आमदार शेखर निकम यांनी तिन्ही दिवस स्पर्धेला हजेरी लावत खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटला. ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवली गेली.

शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित अध्यक्ष तथा उद्योजक सचिन पाकळे, संजय पाकळे यांच्या मार्गदर्शनाखालील स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.  यानंतर या स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यभरातील दहा संघ सहभागी झाले होते. या संघातून नामवंत खेळाडूंनी सहभाग दर्शवून आपला उत्कृष्ट खेळ सादर केला. ही स्पर्धा दिनांक १ मे पासून ते दिनांक ३ मे रोजी दरम्यान प्रकाशझोतात झाली.

या स्पर्धेतील  उपांत्य फेरीचा पहिला सामना जे.के.  स्पोर्ट्स वरवडे विरुद्ध मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा यांच्यात झाला.  या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जे. के. स्पोर्ट्स वरवडे संघाने ५२ धावा करीत मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा संघाला ५३ धावांचे उद्दिष्ट दिले होते. मुन्ना देसाई इलेव्हन संघाने ५३ धावा पूर्ण करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. राजेश सोरटे या खेळाडूने गोलंदाजी करीत अवघ्या ४ धावा देत ४ विकेट्स मिळवित ‘मॅन ऑफ द मॅच’ चा मान मिळवला.

तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना ए. ए. सी सावर्डे विरुद्ध अजिंक्य वॉरियर्स चिपळूण यांच्यात झाला. ए. ए. सी.  सावर्डे संघाने प्रथम फलंदाजी करताना ५४ धावा कुटल्या.  यामध्ये मयूर कारंडे या खेळाडूने चौकार षटकारांची आतषबाजी करीत १९ धावा केल्या. मात्र अजिंक्य वॉरियर्स चिपळूण या संघाने ५४ धावांचे आव्हान लीलया पार केले आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.  यामध्ये वासिक शेख या फलंदाजाने २९ धावा करीत ‘ऑफ द मॅच’ चा मान मिळवला तसेच ४ विकेट घेत गोलंदाजीत देखील कमाल करून दाखवली.

यानंतर अंतिम सामना मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा विरुद्ध अजिंक्य वॉरियर्स, चिपळूण यांच्यात झाला.  हा सामना मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा संघाने जिंकत विजेतेपद पटकावले तर अजिंक्य वॉरियर्स चिपळूण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेतील मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा विजेत्या संघाला ५ लाख रुपये व आमदार शेखर निकम चषक २०२६ आकर्षक चषक तसेच अजिंक्य वॉरियर्स चिपळूण उपविजेत्या संघाला अडीच लाख रुपये व आमदार शेखर निकम चषक २०२६ आकर्षक चषक चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तर विजेता संघ मालक मुन्ना देसाई यांना दुचाकी प्रदान करण्यात आली.

याचबरोबर सामनावीर म्हणून ओमी केणे ( २६ धावा),  मालिकावीर म्हणून अजिंक्य वॉरियर्स चिपळूण संघाचा वासिक शेख या खेळाडूने (१५१ धावा- ६ विकेट्स) घेत मालिकाविराचा मान पटकावला.  या खेळाडूला ५० हजार रुपये बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज समीर जगताप (अजिंक्य वॉरियर्स,  चिपळूण),  मुन्ना देसाई इलेव्हन हातखंबा  संघाच्या किरण पवार या खेळाडूने तब्बल (१०३ ) धावा करीत उत्कृष्ट फलंदाज म्हणून मान मिळवला तर षटकारांचा राजा अजिंक्य वॉरियस चिपळूण या संघाचा वासिक शेख ठरला. या सर्व खेळाडूंना आमदार शेखर निकम यांच्यासह शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डेचे अध्यक्ष तथा उद्योजक सचिन पाकळे, संजय पाकळे, कॅप्टन प्रकाश सावर्डेकर, जि. प. सदस्य सुशील भायजे, संजय कदम, सौ. पूजा निकम, आबा जाधव, रफिक चिलवान आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डेचे अध्यक्ष सचिन पाकळे यांच्यासह संजय पाकळे, विकास नलावडे, गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, देवराज गरगटे, उमेश राजेशिर्के, समीर काझी, विकास घाग, अमित सुर्वे, विशाल सुर्वे, किरण राठोड, सुमित भंडारी, तुषार बिजितकर, संदीप घाग, अमोल सुर्वे, प्रशांत जाधव, ऋषिकेश खानविलकर, बालम जाधव, अरविंद भंडारी, शुभम पाल, विवेक सावंत, राजेश सुर्वे, ओमप्रकाश भंडारी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, तुषार वारे, अभिमन्यू विचारे, सोहम वारे, विकास भंडारी, रोहित सावंत, चिरंजीव भंडारी, आदित्य वारे, विजय भुवड, बाळा विचारे, स्वानंद खानविलकर, गौरव सुर्वे,विनायक कुळे, गौरव सावर्डेकर, रोहित सावर्डेकर, पंकज साळवी आदींनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचे समालोचन क्रीडा समालोचक चंदू शेट्टे, गोपी जाधव,प्रशांत आदवडे, विनायक जाधव यांनी केले.

Total Visitor Counter

3356564
Share This Article