ग्रामीण भागात शासकीय योजना पोहोचवण्यावर भर, २३ विभागांसाठी ५० कार्यकर्त्यांची नियुक्ती
आंबेड: ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या नवनिर्मिती फाउंडेशनच्या उप-कमिटीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकारी निवड बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली.
या बैठकीत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये दत्ताराम खातू यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच, जमूरत अलजी यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या सचिवपदी मुजम्मिल काझी, तर सहसचिवपदी कौस्तुभ धनावडे यांची निवड झाली आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी खजिनदार ओंकार वीरकर यांच्याकडे, तर कार्यवाह म्हणून अभिजित किंजळे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी विविध विभागांसाठी उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रवींद्र सांडीम, सुहास किंजळे (उपाध्यक्ष, मानसकोंड), निसार केळकर (उपाध्यक्ष, आंबेड), रमेश मेस्त्री (उपाध्यक्ष, परचुरी), आणि अमोल वाडकर (उपाध्यक्ष, ओझरखोल) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर निलेश जाधव, तैमुर अल्जी, यासीन सनगे, अतिश पाटणे, पंकज मोहिते, संतोष सांडीम, ओंकार सांडीम, इरफान नेवरेकर, आणि दीपक डावल यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सिकंदर फरास आणि शकील डिंगणकर हे निमंत्रित सदस्य तर युयुत्सु आरते यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.
शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरात पोहोचवण्याचे उद्दिष्ट
नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचे आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. संघटनेचे नवे अध्यक्ष दत्ताराम खातू यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “नवनिर्मिती संघटना ही केवळ नावापुरती न राहता, खऱ्या अर्थाने सामाजिक बदल घडवणारी संघटना ठरेल. शासनाच्या योजना गावागावात पोहोचवून ग्रामीण विकासाला नवे बळ देणे हेच आमचे ध्येय आहे.”
संघटनेचा विस्तार, २३ विभागांसाठी ५० कार्यकर्ते
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेने आपल्या कामाचा अधिक विस्तार केला आहे. संघटनेच्या माध्यमातून २३ विभागांत प्रभावीपणे काम करण्यासाठी ५० कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष दत्ताराम खातू यांनी स्पष्ट केले की, “नवनिर्मिती संघटना ग्रामीण जनतेच्या विकासासाठी प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. शासकीय योजना प्रत्येक गावात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”
आरोग्य शिबिराचा लवकरच संकल्प
सामाजिक बांधिलकी जपत नवनिर्मिती सामाजिक संघटनेकडून लवकरच जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष जमूरत अलजी यांनी माहिती दिली की, या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, औषधोपचार, रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी आणि विविध आरोग्य विषयक सल्ला दिला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे संघटनेने ग्रामीण भागात आरोग्य जनजागृतीचा एक नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प केला आहे.
या बैठकीस संस्थेचे सचिव राजेश आंबेकर, ज्येष्ठ सदस्य सलाउद्दीन बोट आणि डॉक्टर सलीम सय्यद, संचालिका नाझिमा बांगी, सल्लागार युयुत्सु आरते, अण्णा बेर्डे यांच्यासह निसार केळकर, सुहास किंजळे, ओंकार विरकर, रवींद्र सांडीम, संतोष सांडीम, ओंकार सांडीम, शकील डिंगणकर, तैमुर अलजी, वसंत मेस्त्री, मोहिद्दीन मयेर, दिनेश टाकळे, यासीन सनगे, कासम मयेर, अविनाश निंगावले, महमद कापडे, ताजुद्दीन आंबेडकर, मुस्तफा कापडे, दीपक डावल, प्रथमेश सुकम, नरेश किंजळे, निलेश जाधव, कौस्तुभ धनावडे, रमेश मेस्त्री, इरफान नेवरेकर, अमोल वाडकर, सौ सरिता आंबेकर, अभिजीत किंजळे, मुझम्मिल काझी, संघटनेचे अनेक सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्या नव्या पथकाच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात विकासाची गती वाढेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.