GRAMIN SEARCH BANNER

रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारला भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे , रवि अनासपुरे, विजय चौधरी, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते

Total Visitor Counter

2474787
Share This Article