GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा फोटो असोसिएशन वतीने वर्षा सहलीचे आयोजन

रत्नागिरी : फोटोग्राफर बंधूंना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कामातून विश्रांती मिळावी, मानसिक ताजेपणा व्हावा, मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावे.एकमेकांशी स्नेह वृद्धिंगत व्हावेत, व्यावसायिक विचारांची देवाण-घेवाण व्हावी,  सृजन शिलतेला  चालना मिळावी, टिम बिल्डींग,फोटो कौशल्य वृद्धी,सामाजिक बांधीलकी या सर्वाचा विचार करून रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असो वतीने  फोटोग्राफर बंधूसाठी वर्षा सहलीचे आयोजन दरवर्षी केले जाते.या वर्षी देखील रत्नागिरी तालुका असो च्या सहकार्याने उद्या *रविवार‌ दि.20जुलै 2025* रोजी रत्नागिरी तालुकातील कोतवडे नजिकच्या *पिरंदवणे* या निसर्गरम्य ठिकाणी होत आहे. यात फक्त मजा हा हेत नसून‌ मनोवैज्ञानिक दृ्ष्टीकोण‌ या मागे आहे.तरी जिल्हातील सर्व फोटोग्राफर,व्हीडीओ ग्राफर,एडीटर व फोटोग्राफी व्यावसायाशी संबंधीत बंधू भगीनींना विनंती आहे की आपणही यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन रत्नागिरी तालुका व जिल्हा फोटोग्राफर असो.वतीने करण्यात आले आहे
*अधिक माहीतीसाठी या नंबर संपर्क साधावा*
*99307 60376*

Total Visitor Counter

2455607
Share This Article