GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : उंडी समुद्रकिनारी मासेमारी करताना पाण्यात पडून प्रौढाचा मृत्यू

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी : जयगड परिसरातील उंडी समुद्रकिनारी मासेमारी करताना पाण्याचा अंदाज चुकल्याने समुद्राच्या प्रवाहात वाहून गेलेल्या अरुण गणपत गावणकर (५६, रा. उंडी, ता. जि. रत्नागिरी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास घडली.

गावणकर हे नेहमीप्रमाणे उंडी समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेले होते. मात्र समुद्रातील पाण्याचा जोर अचानक वाढल्याने ते प्रवाहात ओढले गेले. काही वेळाने त्यांचा मृतदेह वानाजवळील खडकाळ भागात आढळून आला. तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद खंडाळा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2648593
Share This Article