लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी, युवाशक्ती विभाग यांच्यावतीने श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेटे कनिष्ठ महाविद्यालय वेरवली बुद्रुक येथे शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी श्रावण धारा व पाऊस या विषयावर आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मेडल तर सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
काव्यावाचन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती विभागाचे कोकण प्रदेश (रत्नागिरी-रायगड, सिंधुदुर्ग) अध्यक्ष अरुण मोर्ये, कोमसाप लांजा शाखेच्या उपाध्यक्षा डॉ. माया तिरमारे, कोमसाप युवाशक्तीचे लांजा तालुका प्रमुख प्रविण कांबळे, वेरवली हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण डोळे, सहाय्यक शिक्षक सचिन कांबळे, विनोद बंडगर, शिवाजी बांगर, शैलेश कदम, शुभम भुर्के, प्रदीप लाड, श्रुतीक प्रभुलकर, शिक्षिका सौ. निलिमा जाधव, उज्वला यादव, साक्षी हटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या मूर्ती पूजनाने तर मान्यवरांना पेन देऊन विध्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागता गीताने झाली. कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती विभागाच्यावतीने शालेय स्तरावर ‘ श्रावण धारा व पाऊस ‘ या विषयावर स्वलिखित कविता व प्रसिद्ध कवींच्या कवितांचे वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य वाचन सोर्धेत श्रीराम विद्याल वेरवली बुद्रुकच्या एकूण २८ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी पहिला गट तर इयत्ता नववी ते बारावी असा दुसरा गट होता. कोमसाप युवाशक्तीचे कोकण प्रदेश अध्यक्ष अरुण मोर्ये यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वलिखित काव्य त्याचबरोबर प्रसिद्ध कवींच्या कविता सादर करून कविता म्हणजे काय, कविता कशी तयार होते, ती कशी सादर करावी, कोणत्या प्रकारात कविता वाचन करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक विनोद बंडगर व श्रुतिक प्रभुलकर, प्रदिप लाड यांनी कविता सादर केल्या.
विद्यार्थ्याना काव्य वाचनासाठी ज्येष्ट साहित्यि, सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज यांचे मार्गदर्शन लाभले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरुण डोळे व शालेय व्यवस्थापन कमिटीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिक प्रभुलकर, शिवाजी बांगर यांनी तर आभार प्रदीप लाड यांनी मानले.
वेरवली हायस्कुल येथे कोमसाप युवाशक्तीच्या काव्य वाचन स्पर्धा उत्साहात
