GRAMIN SEARCH BANNER

खेड : वेरळ येथे रेल्वे पुलाखाली गांजा सेवन करणारा युवक ताब्यात

Gramin Varta
92 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील वेरळ परिसरात रेल्वे पुलाखाली बसून गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. पियांश संजय विवार (१९, रा. आवाशी–खेड, मूळ गाव उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून गांजाही जप्त करण्यात आला आहे.

पोलिस पथक गस्त घालत असताना पुलाखाली संशयास्पद हालचाल दिसल्याने तपास सुरू करण्यात आला. त्यावेळी विवार हा गांजा ओढत असल्याचे आढळले. त्वरित त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गांजाचा साठाही जप्त करण्यात आला.

तो हा अमली पदार्थ कुठून आणतो आणि आणखी कोणी या व्यवहारात सामील आहे का, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजेंद्र सातार्डेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Total Visitor Counter

3377110
Share This Article