GRAMIN SEARCH BANNER

आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिर चोरट्यांच्या निशाण्यावर आले असून, मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडली. त्यामधील रोख रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित चोरटे कैद झाले असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3486464
Share This Article