सिंधुदुर्ग : येथे वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांना डंपरने चिरडण्याचा व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्थानकात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ अनधिकृत वाळू तपासणी दरम्यान एका डंपर चालकाने महसूल पथक असलेल्या एका कारला ठोकर देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कुडाळ तालुक्यातील नेरूर ते कुडाळ एमआयडीसी भागात घडली आहे. तर डंपर चालकाची नंबर प्लेट बोगस असल्याचेही समोर आलं आहे. या घटनेनंतर डंपर चालकाने वाळू रस्त्यावर उतरून पळ काढला आहे. तर या प्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर दोन डंपर चालकांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही डंपरचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ प्रांताधिकारी व कुडाळ तहसीलदार यांनी चेंदवन व कवटी परिसरात अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारलेले आठ रॅम उध्वस्त केले या कारवाईसाठी कुडाळ तहसील कार्यालयाचे तलाठी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. ही कारवाई करून महसूल कर्मचारी परतत असताना दोन डंपर वाळू वाहतूक करताना या कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी या डंपर चालकांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता या डंपर चालकांनी महसूल कर्मचाऱ्यांवर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने महसूल कर्मचारी वाचले मात्र यावेळी डंपर चालकांनी घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र महसूल पथकाने या डंपर चालकांचा पाठलाग करत पकडले त्यानंतर कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते दोन्ही डंपर पोलिसांनी चालकांसह कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये आणले व यातील डंपर चालक निखिल नितीन परब वाहन क्रमांक MH07 C 6649 याच्यावर प्राणघात खाण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणणे यासंबंधीत कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला तसेच दुसरे वाहन क्रमांक GA 03 V 8813 व चालक आप्पासाहेब मदने आणि मालक संदीप डिचोलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती तहसील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.
सिंधुदुर्गात महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून डंपर खाली चिरडण्याचा प्रयत्न
