दापोली : तालुक्यातील आसोंड, रोहीदासवाडी येथे कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना २९ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश बाळाराम मुरुडकर (रा. आसोंड, रोहीदासवाडी, दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी स्नेहल सुधीर मुरुडकर (व्यवसाय गृहिणी, रा. आसोंड, रोहीदासवाडी, दापोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून स्नेहल आणि त्यांची मुलगी घरी जात असताना आरोपी मंगेश मुरुडकर याने दारूच्या नशेत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने रस्त्याच्या बाजूला पडलेली बांबूची काठी घेऊन स्नेहल यांच्या डाव्या बाजूच्या कमरेवर मारहाण केली, त्यांना मुक्का मार लागला. एवढेच नव्हे, तर स्नेहल यांचा उजवा हात पिरगाळून त्यांना ढकलून दिले आणि त्यांचे पती सुधीर मुरुडकर हे सोडवायला आले असता त्यांनाही हाताने मारहाण केली.
या घटनेनंतर फिर्यादी स्नेहल मुरुडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, मंगेश बाळाराम मुरुडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.
दापोलीत कौटुंबिक वादातून महिलेस मारहाण, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Comment