GRAMIN SEARCH BANNER

रायगड : कलोते धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
8 Views

खालापूर : तालुक्यातील कलोते धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत तरुणाचे नाव अभय शिवाजी राऊत (वय २३, रा. माजलगाव, जि.बीड) असे असून तो खालापूर तालुक्यातील लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमध्ये कामगार म्हणून चार दिवसांपूर्वीच रुजू झाला होता.

जीन्स आणि टी-शर्ट घालून अभय राऊत यांनी धरणाच्या पाण्यात उडी मारली. मात्र, पोहण्याचे अंतर जास्त असल्याने दमछाख झाली आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. हेल्प फाऊंडेशन खोपोली आणि अपघातग्रस्त संस्था यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2647142
Share This Article