GRAMIN SEARCH BANNER

दापोली : गावठी दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

दापोली : तालुक्यातील गावतळे-दत्तवाडी येथे अवैधरित्या गावठी दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावतळे-दत्तवाडी येथील राहत्या घराच्या मागील पडवीत संबंधित महिलेने सुमारे नऊ लिटर गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेली आढळली. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल सान्वी पाटेकर करीत आहेत.

Total Visitor Counter

3483439
Share This Article