सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील निकम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि लेक्चरर यांना गुरु मानून त्यांचा सन्मान केला.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचे म्हणजेच डॉ. अमोल निकम, डॉ. पूजा यादव, आदिती निकम आणि डॉ. नागमणी यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि शुभेच्छा व्यक्त करून आभार मानले. कार्यक्रमात गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला डिप्लोमा नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, ओ.टी. असिस्टंट, तसेच लॅप्रोस्कोपी असिस्टंट या अभ्यासक्रमांतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निकम इन्स्टिट्यूटमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, अशा सणांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि आदरभावना वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
निकम इन्स्टिट्यूट, सावर्डे येथे विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
