GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर नारडूवे येथे दोन रानगव्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

Gramin Varta
801 Views

संगमेश्वर : तालुक्यातील नारडूवे परिसरात दोन रानगव्यांमध्ये झालेल्या भीषण झुंजीत एका मादी रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. सकाळी सातच्या सुमारास मृत रानगवा आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तेथे पाहणीदरम्यान मादी रानगव्याचा मागील उजवा पाय दुसऱ्या गव्याच्या शिंगात अडकून गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. आसपासच्या जमिनीवरही झुंजीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यानंतर पशुधन विकास अधिकारी कडवई यांनी मृत रानगव्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून लाकडाच्या साहाय्याने दहन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

घटनास्थळी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सूरज तेली, सुप्रिया काळे तसेच ग्रामस्थ संदेश जोगळे, अर्जुन जोगळे यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Total Visitor Counter

3375956
Share This Article