GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर उपळे येथून ५५ वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

Gramin Varta
266 Views

संगमेश्वर : तालुक्यातील उपळे पवारवाडी (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी सौ. सरिता सागर सुर्वे (वय ५५) या महिला नापत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता नोंद क्रमांक १८/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास सौ. सरिता सुर्वे या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी परिसरात, नातेवाईकांकडे व ओळखीच्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला; मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.४६ वाजता त्यांचे पती सागर घोडू सुर्वे (वय ५६) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नापत्ता महिलेचे वर्णन असे आहे : सौ. सरिता सागर सुर्वे, शिक्षण सातवी, उंची सुमारे ५ फूट १ इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, काळे लांब केस, काळे डोळे व उभट चेहरा. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात छोट्या काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असून अंगावर लाल व काळ्या रंगाची सहवारी साडी, लाल ब्लाऊज आणि पायात पिवळ्या रंगाची चप्पल होती. भाषा मराठी आहे.

या प्रकरणाची नोंद पोलीस अंमलदार व्ही. एस. तावंडे यांनी घेतली असून पुढील तपास पोहेकॉ/४६५ वाय. एम. सासवे करीत आहेत. नापत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेश पाठविण्यात आला आहे.

सौ. सरिता सुर्वे यांच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Total Visitor Counter

3372452
Share This Article