संगलट : खेड येथील एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी आस्था गुरुनाथ सारंग हिने नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी परीक्षेच्या निकालात ९८.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
लहानपणापासूनच शिक्षणाची विशेष आवड असलेल्या आस्था हिने सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. शालेय जीवनात ती नेहमीच अभ्यासात अग्रेसर राहिली असून तिच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले. विशेषतः सारंग सर यांचे तिला वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले जाते.
आस्था हिच्या यशाबद्दल खेड तालुक्यासह शाळेतील शिक्षकवर्ग, व्यवस्थापन समिती तसेच विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड: एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आस्था सारंग हिचे दहावीत ९८.२० टक्के गुण मिळवत घवघवीत यश






