GRAMIN SEARCH BANNER

खेड: अमशेतच्या तैसीर परकार यांना वैद्यकीय पदवी; एफएमजीई परीक्षेतही प्रथम श्रेणीने यश

Gramin Varta
90 Views

संगलट (खेड) : खेड तालुक्यातील अमशेत गावचे सुपुत्र तथा दुबईस्थित व्यावसायिक इब्राहिम परकार आणि सांगलट येथील माहेरवाशीण वसीमा इशाक नाडकर यांचे सुपुत्र डॉ. तैसीर वसीमा इब्राहिम परकार यांनी वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करत एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल खेड तालुक्यासह अमशेत आणि सांगलट परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. तैसीर परकार यांनी २०२४ साली चीनमधील झेंगझोऊ विद्यापीठातून एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी एफएमजीई परीक्षा २०२५ प्रथम श्रेणीने उत्तीर्ण करत इंडियन मेडिकल कौन्सिलचा परवाना मिळवला.

लहानपणापासून शिक्षणाची आवड आणि डॉक्टर होण्याचे ध्येय मनाशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. आपल्या यशामागे आई-वडील यांच्यासह चुलते बशीर परकार आणि चुलती शकीला बशीर परकार यांचे मोठे योगदान असल्याची भावना डॉ. तैसीर यांनी व्यक्त केली.डॉ. तैसीर यांच्या यशामुळे अमशेत, सांगलट तसेच संपूर्ण खरीपट्टा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3374542
Share This Article