GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : धामणसेत अनोळखी वाहनाच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू

Gramin Varta
123 Views

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या अपघातात दोन बैलांचा मृत्यू झाला. चाफे ते गणपतीपुळे मार्गावर गुरे घेऊन जाणारे विश्वनाथ अनंत आग्रे (वय ४५, रा. धामणसे, रेवाळेवाडी) यांचे हे बैल होते. गुरे चरवून परत येत असताना गणपतीपुळेकडून येणाऱ्या अनोळखी वाहनाने त्यांच्या दोन बैलांना जोराची धडक दिली.

या प्रकरणी विश्वनाथ आग्रे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

Total Visitor Counter

3369387
Share This Article