रत्नागिरी: रत्नागिरी ते पंढरपूर ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची पहिली सायकलवारी यशस्वी करून दहा सायकल वारकरी रत्नागिरीत परतले. ही वारी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली.
सायकल वारकऱ्यांना विठुरायाचे आशीर्वाद मिळाले.
ऊन, वारा, पाऊस, रस्त्याच्या कामामुळे खराब झालेले रस्ते यावर मात करत वारकरी पंढरपुरात पोहोचले. विठुरायाच्या दर्शनाने सर्वजण भावुक झाले.
सायकल चालवा, निरोगी राहा, झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा, प्रदूषण वाचवा, असा पर्यावरणपूरक संदेश या वारीतून या सायकलस्वारांनी दिला. तसेच भक्ती आणि शक्ती असा संदेश या वारीतून दिला. या वारीत विशाल भोसले, महेश सावंत, अमित पोटफोडे, आरती दामले, गजानन भातडे, नारायण पाटोळे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर सहभागी झाले.
रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून वारीला सुरवात झाली. काकड आरती व प्रसाद घेऊन वारकरी पाली, साखरपा, आंबा घाटमार्गे मलकापूर, कोकरूड, कराड व उंब्रजला पोहोचले. रात्री पावसामुळे पोहोचण्यास उशिर झाला तरी उंब्रज भोसलेवाडीत ग्रामस्थ वाट पाहत होते. स्वागतावेळी सरपंच मारुती ढेबे, पत्रकार अभिजित पवार, पत्रकार प्रवीण कांबळे, ग्रामस्थ हभप किरण भोसले, संदीप भोसले, सुधाकर भोसले, प्रकाश भोसले, संदेश भोसले, विक्रम भोसले, स्वप्नील भोसले, संजय भोसले, अक्षय भोसले, अधिक भोसले, विजय भोसले, रतन भोसले आणि सौ. सीमा भोसले आदी उपस्थित होते.
आता पुढील वर्षी अधिक सायकल वारकरी वारीला रवाना होणार असल्याचा निश्चय करण्यात आला.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सायकल वारकऱ्यांना मिळाले विठ्ठलाचे आशीर्वाद
