गुहागरात विजापूर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

गुहागर / प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

मृत इसमाचे नाव विठ्ठल उमलू चव्हाण (वय ४५) असे असून, तो वेळणेश्वर येथील मोडकागर वेळणेश्वर मार्गावरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या माळरानात काजूच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.विठ्ठल चव्हाण हे मूळचे बम्मण जोगी, सिंदगी तालुका, विजापूर जिल्ह्यातील रहिवासी होते. सध्या ते वेळणेश्वर येथील इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील जागेत झोपडी उभारून वास्तव्यास होते.

या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *