GRAMIN SEARCH BANNER

गुहागरात गवारेड्याची कारला जोरदार धडक; कारचे मोठे नुकसान; चालक बचावला

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी ते चिखली दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास ओमकार मंगल कार्यालयासमोर गवारेड्याने इरटीगा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने वाहनचालकाला गंभीर दुखापत झाली नाही.

वाहनचालक रविवारी रात्री डिझेल भरण्यासाठी चिखलीकडे जात असताना शृंगारतळी–चिखली मार्गावर ओमकार मंगल कार्यालयासमोर शेजारील जंगलातून अचानक गवारेड्या रस्ता ओलांडण्यासाठी आला. याचवेळी त्याने भरधाव इरटीगा कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
या मार्गावर अशा प्रकारच्या वन्यप्राण्यांच्या धडकांच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या महामार्गावर वन्यप्राणी रस्त्यावर येऊ नयेत यासाठी वन विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुहागर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3438110
Share This Article