GRAMIN SEARCH BANNER

महिलेची १.१६ लाखांची ऑनलाइन फसवणूक; सावर्डे पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा

Gramin Varta
158 Views

चिपळूण : तालुक्यातील कुटरे येथे खोट्या संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल तयार करून एका महिलेची १ लाख १६ हजार ५४८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलोनी आणि सुरज (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ललिता भूषण महाब्दी (वय ३७, मूळ राहणार ठाणे, सध्या राहणार कुटरे) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी ललिता महाब्दी यांच्याशी संपर्क साधून, तुमच्या व्यवसायासोबत अधिक सेवा ग्राहकांना देता येतील, ग्राहक सेवा केंद्रात मिळणाऱ्या विविध सुविधा त्यांच्या संकेतस्थळावरून पुरवण्यात येतील तसेच त्यासाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध करून दिली जाईल, असे आमिष दाखवले. त्यानंतर खोट्या संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल तयार करून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने त्यांच्याकडून पैसे स्वीकारण्यात आले. या प्रक्रियेत महाब्दी यांची एकूण १ लाख १६ हजार ५४८ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

Total Visitor Counter

3387165
Share This Article