GRAMIN SEARCH BANNER

मिऱ्या बंदर येथे पर्यटकांच्या कारचा अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटली

रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या प्रसिद्ध मिऱ्या बंदर परिसरात रविवारी सायंकाळी पर्यटकांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्यावरच उलटली. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने या भीषण अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार ही जिल्ह्याबाहेरील पर्यटकांची असून ते मिऱ्या बंदर परिसरात फिरण्यासाठी आले होते. तरी परिसरातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी झाली. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने आणि कोणालाही दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Total Visitor Counter

3399795
Share This Article