GRAMIN SEARCH BANNER

खेडनजीक वेरळ येथे कार-दुचाकीचा भीषण अपघात; चार जण जखमी

Gramin Varta
77 Views

खेड: मुंबई-गोवा महामार्गालगतच्या वेरळ येथील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मुंबईतील भांडुप येथून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. भरधाव कारने पुढून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर जाऊन आदळली.

या अपघातात कारमधील प्रवासी शीला राजाराम दळवी, सदानंद गणपत दळवी, गिरीश राजाराम दळवी (सर्व राहणार भांडुप, मुंबई) आणि दुचाकीस्वार दीपक अनंत गोवळकर (राहणार वेरळ, खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका परिसरातील रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्गालगतच्या या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3348115
Share This Article