GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग निलंबित

Gramin Varta
1.3k Views

ब्रीफिंगला अनुपस्थित राहिल्याने कारवाई

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव असलेले आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सभागृहात प्रदूषणविषयक मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संबंधित प्रकरणावर ब्रीफिंगसाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देवेंद्र सिंग यांना बोलावले होते. मात्र, ते ब्रीफिंगसाठी उपस्थित न राहिल्याने हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

या प्रकाराची गंभीर दखल घेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. प्रशासकीय शिस्त व जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी तत्काळ कारवाई करत आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शासकीय बैठका व सभागृहातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश या निलंबनातून देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3366221
Share This Article