GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : हातखंबा येथे गॅस टँकरचा पुन्हा अपघात, टँकर घुसला टपरीत

Gramin Varta
11 Views

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा शाळेजवळ पुन्हा गॅस वाहू टँकरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4 दिवसात पुन्हा गॅस टँकरचा अपघात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा अपघात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने ज्या टपरी मध्ये टँकर घुसला त्यामध्ये कोणीही नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने गॅस टँकर चालला होता. हातखंबा येथील शाळेजवळ आला असता उतार आणि नागमोडी वळणे यामुळे चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी चालकाचा गाडीवर ताबा सुटला आणि टँकर थेट वडापाव च्या टपरीत घुसला. सुदैवाने चालकाने उडी मारल्याने बचावला. टँकरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा टॅबचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हातखंबा येथील ग्रामस्थ ही अपघातानंतर मदतीसाठी धावले.

Total Visitor Counter

2648883
Share This Article