GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पालिका विविध समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध

Gramin Varta
172 Views

रत्नागिरी: रत्नागिरी पालिका विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली.यामध्ये शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी समीर जगन्नाथ तिवरेकर यांची निवड करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी संतोष दत्तात्रय कीर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी निमेश विजय नायर स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री. राकेश चंद्रकांत नागवेकर, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी सुहेल अब्दुल लतीफ साखरकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती प्रिती रवींद्र सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन निवड झालेल्या सभापतींकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3379714
Share This Article