मुंबई: जुलै महिन्यापासून भारतातील अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर महिन्याच्या बजेटवर होताना दिसणार आहे. अगदी रेल्वे टिकीटांपासून ते ATM चार्जपर्यंत आणि पॅन कार्डपासून (PAN Card) ते क्रेडिट कार्ड (Credit Card) पेमेंटपर्यंत अनेक मोठे नियम जुलै महिन्याच्या १ तारखेपासून बदलण्यात येणार आहेत.
नेमके ते बदल काय आहेत ते पाहूया.
Rule Changes From July 1: जुलै महिन्यापासून भारतातील अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर महिन्याच्या बजेटवर होताना दिसणार आहे. अगदी रेल्वे टिकीटांपासून ते ATM चार्जपर्यंत आणि पॅन कार्डपासून (PAN Card) ते क्रेडिट कार्ड (Credit Card) पेमेंटपर्यंत अनेक मोठे नियम जुलै महिन्याच्या १ तारखेपासून बदलण्यात येणार आहेत. नेमके ते बदल काय आहेत ते पाहूया.
१ जुलै २०२५ पासून, UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, GST रिटर्न आणि HDFC बँक क्रेडिट कार्ड यामध्ये बदल पाहायला मिळणार आहे. सरकार हे नियम लावून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित करू इच्छितात.
१. UPI चार्जबॅकसाठी नवा नियम
आतापर्यंत, जर ट्रांजॅक्शनवर चार्जबॅक क्लेम रिजेक्ट होत असेल, तर बँकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून परवानगी घेऊन केस पुन्हा प्रोसेस करावी लागत होती. परंतु, २० जून २०२५ रोजी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, बँका आता स्वतःहून योग्य चार्जबॅक क्लेम्स पुन्हा प्रोसेस करू शकतात, यासाठी त्यांना NPCI च्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही. यामुळे ग्राहकांना जलद आणि अधिक प्रभावी उपाय मिळेल.
२. नवं पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार अनिवार्य
सध्या राज्यात आधार कार्ड ओळख पटवण्यासाठी अनिवार्य झाले आहे. त्यामुळे जर कोणालाही नवं पण कार्ड काढायचं असेल, तर त्याच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक असेल. १ तारखेपासून हा नियम अनिवार्य करण्यात येणार आहे.
३. Tatkal तिकीट बुकिंगसाठी OTP आणि आधार आवश्यक
नव्या नियमानुसार जर तुम्हाला IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करायचे असेल तर आधार व्हेरिफिकेशन आवश्यक असेल. तर १५ जुलै पासून ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी किंवा पीआरएस काउंटरवर, ओटीपी द्यावा लागणार. दरम्यान, अधिकृत तिकीट एजंट आता बुकिंग विंडो उघडण्यापूर्वी ३० मिनिटं आधी तत्काळ तिकिटं बुक करू शकणार नाहीत. एसी क्लास तिकिटांसाठी, सकाळी १० ते १०: ३० पर्यंत, नॉन-एसी तिकिटांसाठी, सकाळी ११ ते ११: ३० पर्यंत असेल.
४. GST रिटर्नसाठीही कडक नियम
नव्या नियमानुसार, जुलै २०२५ पासून जीएसटीआर-३ बी फॉर्म हा एडिट करता येणार नाही. तसेच, तुमची जीएसटीआर फाईल वेळेवर भरावी लागणार आहे. कारण, आता कोणताही करदाता ३ वर्षांनंतर आधीचा जीएसटी रिटर्न दाखल करू शकणार नाही. हा नियम जीएसटीआर-१, जीएसटीआर-३बी, जीएसटीआर-४, जीएसटीआर-५, जीएसटीआर-५ए, जीएसटीआर-६, जीएसटीआर-७, जीएसटीआर-८ आणि जीएसटीआर-९ सारख्या अनेक रिटर्न फॉर्मवर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वेळेवर वेळेवर रिटर्न भरण्याची सवय लावून घ्या.
५. क्रेडिट कार्ड युजर्ससाठी एचडीएफसी बँकेचा मोठा बदल
HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवं शुल्क आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये बदल बदल करण्यात येणार आहेत. जर तुमचा एक महिन्याचा खर्च १०, ००० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अतिरिक्त १ टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय, ५० हजारांपेक्षा जास्त युटिलिटी बिलांवर, १०,००० पेक्षा जास्त ऑनलाईन गेमिंगवर, १५,००० पेक्षा जास्त इंधन खर्चावर आणि शिक्षण किंवा भाड्याशी संबंधित तृतीय पक्ष पेमेंटवर देखील १ टक्के शुल्क आकारलंजाणार आहे. या सर्व शुल्कांची कमाल मर्यादा प्रति महिना ४,९९९ ठरवण्यात आली आहे. यासोबतच, आता ऑनलाइन कौशल्य-आधारित गेमिंगवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध होणार नाहीत आणि विमा पेमेंटवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सवर देखील मर्यादा घालण्यात आली आहे.